सांगली :  मळणी मशीन मध्ये साडीचा पदर अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करंजे गावातील मदने मळ्यात घडली आहे.  सुभद्रा विलास मदने वय 50 असे मयत महिलेचे नाव आहे. दुपारच्या सुमारास गव्हाची मळणी सुरु असताना ही घटना घडलीय.


खानापूर तालुक्यातील करंजे येथे मळणी मशीनमध्ये साडी अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी करंजे येथे घडली. करंजे येथील मदने मळा येथे  सुभद्रा विलास मदने वय 50 या शेतात मळणीचे काम करत होत्या. 


 यावेळी गहू मळणी सुरु असताना त्या पडलेले गहू वेचत होत्या. याचवेळी अचानकच त्यांची साडी मळणी मशिनमध्ये अडकली. क्षणातच त्या मशिनमध्ये खेचल्या गेल्या. चालकाने मशिन बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेत सुभद्रा यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुगणालयात पाठविला.मात्र या घडलेल्या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती,  दोन मुलै, एक मुलगी,सुना,नातवंडे,असा परिवार आहे.  


 या घटनेची नोंद खानापूर विटा पोलीसात आहे.  सुभद्रा यांच्या मृत्यूची बातमी कळताच विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्हछेदनासाठी करंजे भिवघाट  ग्रामीण रुगणालयात पाठविला.परंतु या घडलेल्या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.


संबंधित बातम्या :


मळणी यंत्रात केस अडकल्याने महिलेचं डोकं धडावेगळं, सोलापुरातील पोठरे गावातील दुर्घटना