हिंगोली : विनाकारण होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोलीस आता बळाचा वापर करू लागले आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलिसांकडून याचा गैरवापर होताना दिसत आहे. कारण, नियम मोडणाऱ्या लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा, दंड करायला हवा. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंची पाहणी केली. तर पोलीस चालू गाड्यांवरही मारहाण करताना दिसत आहेत. त्यामुळे एखादा गाडीवरुन पडून मोठा अपघातही होऊ शकतो. अशीच एक घटना हिंगोलीत घडली आहे. नगर परिषदेतील आपली ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या एका महिलेला ओळखपत्र दाखवूनही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे या महिलेच्या पोलीस असलेल्या वडिलांसमोरच ही मारहाण झाली.




नांदेड नाक्यावर वाहनधारकांची चौकशी चालू असताना हिंगोली नगर परिषदेमध्ये कर्मचारी असलेली महिला ड्युटी संपवून वडिलांसोबत घरी जात होती. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस महिला अधिकाऱ्याने ओळख सांगून देखील या कर्मचारी महिलेस मारहाण केली आहे. या मारहाणीत ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याला पाच टाके पडले आहेत. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिलेचे वडिलांसमोर ही मारहाण करण्यात आली. पीडितेचे वडील देखील पोलीस आहेत. त्यांनी देखील या महिलेला मारहाण करू नका मी पण पोलीस आहे असे सांगितले असताना देखील या उद्धट महिला पोलीस अधिकाऱ्याने ऐकलं नाही. पोलीस पिताच्या समोरच त्यांच्या लेकीला मारहाण केली.


Coronavirus | कोरोना संकट | राज्यभरात 22,118 खोल्यांमध्ये 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण


ओळखपत्र दाखवूनही मारहाण
नगरपालिकेतील काम आटोपून वडिलांसोबत घरी जात असताना पोलिसांनी नांदेड नाक्यावर अडवले. चौकशी करण्यापूर्वीच मला मारहाण केली, माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माझ्यासोबत असलेले वडीलही सांगत होते. परंतु, पोलीस महिला अधिकाऱ्याने एकही ऐकले नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या महिलेवर सध्या साखगी रुग्णालात उपचार सुरू आहेत. पीडितेचे वडील हे हिंगोली मधल्या पोलीस स्टेशनला कामावर आहेत. मंगळवारी कनेरगाव नाका येथील चेक पोस्टवरुन ते दिवसभर ड्युटी करून घरी आले. हिंगोलीमधील रुग्णालयातून ब्लड शुगरच्या गोळ्या घेऊन घरी परतत होते. इतक्यातच त्यांना त्यांच्या मुलीचा फोन आला, की पप्पा माझी ड्युटी संपली आहे मला पण घरी येऊ द्या. मुलगी आणि मी सोबत घरी येत असताना नांदेड नाक्यावर महिला पोलीस अधिकारी पुंडगे यांनी आमची स्कुटी आडवली व माझ्या समक्ष माझ्या मुलीला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलीस असलेल्या वडिलांनी दिली आहे.


coronavirus | कोरोनापासून बचावासाठी आदिवासी भागात झाडांच्या पानांचे मास्क


पोलीसचं माझ्याशी खोटं बोलले
मारहाणीत माझी मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून मारहाणीनंतर रक्त वाहत होते. हा सर्व प्रकार मी त्या अधिकाऱ्याला सांगितला. परंतु, तिने न एकता मारहाण सुरुच ठेवली. नंतर मी तिथून पळ काढला तर त्यांनी स्वतःहून तिला एका खासगी रुग्णालयात भरती केले. मला एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने फोन करून सांगितले की तुमची मुलगी अपघातात जखमी झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझ्या डोळ्यासमोर घडलेला सर्व प्रकार पोलीस कर्मचारी असताना माझ्यासोबत खोटं बोलले, हे योग्य नाहीये, असा आरोप पीडित मुलीच्या पोलीस बापाने केला आहे.


Coronavirus | Social Distancing | मुंबईत गर्दी टाळण्यासाठी लोकांच्या सुरक्षित अंतर ठेऊन रांगा