गडचिरोली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवसत वाढत आहे. हा वाढता प्रसार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसाच लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रासह शेजारच्या छत्तीसगढ राज्यातील जनतेलाही घरी राहण्याचे आदेश राज्य शासनाने सांगितलं आहे. राज्य शासन कोरोनाविषयी दुर्गम भागात देखील जनजागृती करत आहे. कोरोनापासून कसा बचाव करता येईल यासाठी उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्कचा वापर करण्याचे सांगितले आहे. छत्तीसगढ राज्यातील दुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा परिसरातील भर्रीटोला गावातील लोकांनी चक्क झाडाच्या पानापासूनच मास्क बनवलं आहे.


आमाबेडा परिसरातील भर्रीटोला या गावाची गावबंदी देखील केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडू शकतात ना बाहेरील नागरिक गावात प्रवेश करू शकतात. दुर्गम भागातील आदिवासी शहरात जाऊन मास विकत घेऊ शकत नाही त्यामुळे आमची काळजी आम्हालाच घ्यायचं आहे असे शासनाने सांगितलं आहे. त्यामुळे गावांतील लोकांनी हा आगळा वेगळा उपाय शोधून काढला आहे. रोज हे आदिवासी गावात असलेल गोटूल (समाज भवन) मध्ये येतात आल्यावर आपले हात स्वच्छ धुऊन गोटूलात प्रवेश करतात आणि त्यानंतर सर्वांना झाडाच्या पानापासून तयार केलेलं मास्क वितरित करतात.


गावातील प्रमुख कोरोना व्हायरसबाबत वेळोवेळी जनजागृतीही करतात. गावातील नागरिक सकाळी जंगलात जाऊन झाडाची पाने तोडून आणतात आणि पानापासून मास्क बनवतात. एकदा वापरलेले मास्क संध्याकाळी जाळून टाकण्यात येतात. आणि दुसऱ्या दिवशी परत मास्क बनवून वापरण्यात येतात.


शहरांत वारंवार आवाहन करून सुद्धा सुशिक्षित नागरिक मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. मात्र नक्षलग्रस्त दुर्गम अशा आदिवासी भागातील जनता स्वतःची काळजी स्वतः कशाप्रकारे घेता येईल याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी अशी ही आगळीवेगळी आदिवासी बांधवांचा उत्तम उपाय योजना आहे.


राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी :
मुंबई शहर आणि उपनगर - 51
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1


Gudi Padwa | नाशिकमध्ये अनोखी आणि लक्षवेधी गुढी; जनजागृतीसाठी गुढीला लावलं मास्क | ABP Majha




संबंधित बातम्या : 


सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की


Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित