मुंबई : मद्यविक्रीची दुकानं आता गावातून हद्दपार होणार आहेत. गावातील मद्यविक्रीची दुकाने गावकुसाबाहेर स्थलांतरीत करण्याचे अधिकार सरकारने ग्रामपंचायतीला दिले आहेत. ग्रामसभेत बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यास दारुचं दुकान गावाबाहेर जाईल.
उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. गावामध्ये दारु नको, अशी गावांची मागणी आहे. गावात लोकवस्तीबाहेर जिथे 10 पेक्षा कमी घरे आहेत, तिथून 100 मीटर अंतरावर दुकान स्थलांतरित करण्याचा अधिकार ग्रामसभेला असेल, असं बावनकुळे म्हणाले.
मद्य परवान्यावर आता फक्त दोन बॉटल
मद्य परवान्यावर दारुच्या 12 बॉटल घेता येत होत्या. मात्र आता परवान्यावर केवळ दोनच बॉटल घेणार आहेत. सरकारकडून या संदर्भात लवकरच GR काढण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशी दारुच्या विक्रीत 5 ते 10 टक्के वाढ झाली असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.