मुंबई: रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना दिलासा दिला आहे. जिल्हा बँकांनी त्यांच्या खातेदारांना पैसे काढण्याची मुभा द्यावी, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.


पाचशे-हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, या जुन्या नोटा जिल्हा बँकेत स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास बंदी घातली होती. रिझर्व्ह बँकेने १४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ही बंदी घातली होती. मात्र आता आरबीआयने थोडी सूट देत, जिल्हा बँकांनी खातेदारांना त्यांच्या खात्यातील पैसे देण्याची मुभा दिली आहे.

याशिवाय लीड बँकांनी जिल्हा बँकांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे पैसे देण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

मात्र जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलण्यास घातलेली बंदी अद्याप कायम आहे.



जिल्हा बँकांतून नोटा बदलण्यास बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरची मुदत दिली. मात्र जिल्हा बँकांना नोटा बदलीची परवानगी देण्यात आली नाही.

सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली


मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पहिले पाच दिवस जिल्हा बँकांमध्ये पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारल्या. या बँकांमध्येही नोटा बदलण्यासाठी गर्दी होती. मात्र 14 नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढून जिल्हा बँकांमध्ये 500-1000 च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. याशिवाय या नोटा बदलून देण्यासही मनाई केली.

जिल्हा बँकेवरील ‘नोटबंदी’ मागे घ्या, विरोधकांची मागणी


जिल्हा पातळीवर विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं. मात्र या बँकांमधून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत होतं.

ग्राहकांच्या ठेवीवर परिणाम होईल : सहकारी बँक

जिल्हा बँकेचे जवळपास 20 लाख ठेवीदार आहेत. खातेधारकांनी विविध कारणांसाठी पुंजी जमा करून ठेवलेली असते. ती पुंजी जिल्हा बँकेत जमा करण्यास आल्यानंतर स्वीकारण्यासाठी नकार देणं उचित नाही. त्याचा परिणाम ठेवीवर होईल, असं सहकारी बँकांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास, बदलून देण्यास मनाई


तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले

यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?

सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ

बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार

काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या खात आहेत : मोदी

सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ

सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?

कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?