Sangli News : देशात बांगलादेशी अवैध घुसखोरांचा देशभरात उच्छाद सुरु आहे. सहजपणे अवैध कागदपत्रे तयार करून बांगलादेशी देशाच्या कानाकोपऱ्यात आसरा घेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशींविरोधात कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत बांगलादेशींचा सर्वाधिक विळखा पडल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता बांगलादेशींनी पुण्या मुंबईतील खर्च पाहून आता राज्यातील छोट्या शहरांमध्ये मोर्चा वळवला आहे. यामध्ये त्यांच्याकडे बनावट भारतीय कागदपत्रे सुद्धा असल्याने गैरप्रकारही वाढत चालले आहेत. आता पोलिस तपासात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात लावून घेतला आहेच, पण अधिक सतर्क राहण्यास सुद्धा इशारा दिला आहे. 


बांगलादेशीने नागरिकाने दिलेल्या उत्तरानंतर सांगली पोलिस च्रकावून गेले


भारतात अवैध मार्गाने घुसखोरी केलेल्या बांगलादेशीने नागरिकाने दिलेल्या उत्तरानंतर सांगली पोलिस च्रकावून गेले आहेत. पुण्यातून मुंबईत गेल्यानंतर राहणीमानाचा खर्च अधिक असल्याने  त्याने अधिक माहिती घेत सांगली गाठल्याचे एटीएसच्या तपासात माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस सुद्धा अवाक् झाले. संशयित एमडी हुसेन असं त्याचं नाव असून सांगलीत न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याने  बनावट कागदपत्रांसाठी  20 हजारांचा खर्च केल्याचे सुद्धा तपासात समोर आले. 


आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे बनवली 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली पोलिस गस्तीवर असताना शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर संशयित आढळला. यावेळी त्याची सुरुवातीला चौकशी केली असता खिशातील आधारकार्ड काढत दिल्लीतील आमीर शेख असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या बोलण्यातून पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. यानंतर त्याने  ढाकामधील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता तो बांगलादेशी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत घुसखोरी केल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, तर बांगलादेशात एका राजकीय पक्षाशी संबंधित होता. 


त्याने घरातून येताना जवळ एक लाख रुपये ठेवले होते. भारतात अवैध घुसखोरी केल्यानंतर त्याने आधारकार्डसह बनावट कागदपत्रांसाठी 20 हजार खर्च केले. तसेच इतर प्रवास आणि इतर खर्चासाठी काही पैसा त्याने खर्च केला आहे.


एजंटांची भूमिका महत्त्वाची


दरम्यान, घुसखोरी फक्त सीमेपुरती मर्यादित नाही. घुसखोरांना सीमावर्ती भागापासून दूर असलेल्या भारतीय शहरांमध्ये स्थायिक होण्यास मदत करण्यात एजंट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे एजंट बनावट कागदपत्रे आणि नोकरीची व्यवस्था करतात, ज्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांची नवीन ओळख निर्माण होते. काही ठिकाणी घुसखोरांसाठी वस्ती सुद्धा स्थापन झाली आहे. 


या वस्तूंची तस्करीही केली जाते


मानवी घुसखोरी व्यतिरिक्त, हे नेटवर्क गुरेढोरे, अंमली पदार्थ, सोने आणि इतर अवैध वस्तूंच्या तस्करीमध्ये खोलवर गुंतलेले आहेत. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनहाटा येथे अवैध कृत्यांमधून दररोज सुमारे 80 लाख रुपये कमावले जातात. सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे तस्कर 10,000 ते 15,000 रुपये कमावतात.