राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल होताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पद देणार या आश्वासनावरच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे देवराम भोईर यांनी सांगितले आहे. तर संधी मिळाली तर पुन्हा महापौर होण्याची आपल्याला देखील इच्छा असल्याची प्रतिक्रिया विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महापौर पदाच्या या रेसमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. कोणत्याही पदासाठी पक्षात काम करत नसून पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असे ते म्हणाले.
ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवगाचे आरक्षण पडल्यानंतर महापौर पदासाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळं महापौर पदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर अँड फॅमीलीमधील स्वत: देवराम भोईर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांना पक्षात घेतानाच ही कमीटमेन्ट दिली होती. मात्र, आता संजय भोईर यांनी स्थायी समिती दिल्याने देवराम भोईर यांचे नाव या यादीतून बाहेर फेकले गेल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रांनी दिली आहे. असे असले तरी देवराम भोईर यांनी मात्र आपला महापौर पदाचा दावा कायम ठेवला आहे.
पालकमंत्री यांनी मला दिलेले आश्वासन विसरणार नाही, अशी मला पूर्ण खात्री आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे देखील महापौर पदासाठी पुन्हा इच्छुक असल्याने यामध्ये चुरस आणखी वाढली आहे. महापौर पदासाठी ज्यांचे नाव आघाडीवर आहे त्या नरेश म्हस्के यांनी मात्र सर्व चेंडू पक्षश्रेठींकडे टोलवला आहे. पक्षात काम करणे हाच एकमेव उद्देश असून पदाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :-
ठाण्यातील 3527 झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नससेल्या ठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका, उच्च न्यायालयाचे आदेश