मुंबई : काही दिवसापर्यंत राज्यातील कोणतीही राजकीय घडामोड मातोश्रीवरुन सुरु होत असे. मात्र हेच चित्र गेल्या काही दिवसात बदललं आहे. उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीबाहेर जाऊन चर्चा करत आहेत. याआधी शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर यावं लागायचं. एवढच काय शिवसेनेने आपल्या अजेंड्यासोबत कार्यशैलीसुद्धा बदलली आहे. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एक चेहरा आदित्य ठाकरेंच्या रुपानं निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि विधानसभेत निवडूण पण आला.
एक वेळ अशी होती की शरद पवार, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख मातोश्रीवर जाऊन बाळासाहेंची भेट घेत आणि राजकीय चर्चा करत. एक वेळ मातोश्रीवरुन रिमोट कन्ट्रोल चाले. एकूणच सर्व राजकीय घडामोडींचं मातोश्री हे पॉवर सेंटर होतं. एवढच काय प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मातोश्रीवर जाऊन पाठिंबा मागितला होता. मात्र, राज्यातील निवडणुकीत जी शिवसेनेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात उभी राहीली, तीच शिवसेना सत्ता स्थापनेसाठी आज काँग्रेस-राष्ट्रावादीसोबत चर्चा करत आहे.
सध्या राज्यातील परिस्थिती बदलेली दिसत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे नेहमी विरोधात राहत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत आहेत. ही चर्चा सुद्धा होत आहे मातोश्री बाहेर. शिवसेना भाजपच्या युतीत हे कधीच झालं नाही. राजकारणासंदर्भात आजवर ज्या चर्चा झाल्या त्या मातोश्रीवरच झाल्यात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीला भेट दिली होती.
इटलीच्या मुद्यावरुन सामना वर्तमानपत्रातून सोनिया गांधींवर नेहमी टीका केली जायची. बाळासाहेब ठाकरेंनीदेखील सोनिया गांधींवर परदेशी बाई म्हणून टीका केली होती. मात्र, सध्या शिवसेनेचे खास शिलेदार सोनिया गांधींच्या जवळच्या असलेल्या अहमद पटेलांसोबत चर्चा करत आहेत. त्यासाठी मातोश्रीला दिल्ली गाठावी लागत आहे.


सेना-भाजप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी कोणीच सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सेनेच्या आघाडीसोबत बैठका सुरु आहेत. शिवसेनेच्या शरद पवारांसोबत बैठकी, तर दिल्लीत सोनियादारी फोनाफोनी सुरु आहेत. मात्र, अद्यापही मातोश्रीला मुख्यमंत्रीपद दूरच आहे असंच दिसतंय.

संबंधित बातम्या :

एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार, फडणवीस यांचा बैठकीत निर्धार : सूत्र

राज्यातील सत्ताकोंडी 17 नोव्हेंबरपूर्वी फुटणार? शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश

आघाडी-शिवसेना नेत्यांची बैठक संपली, लवकर सत्ता स्थापन करण्याचे विजय वडेट्टीवारांचे संकेत