Nandkishor Chaturvedi : सध्या राज्यभर चर्चा आहे ती, केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या कारवायांची. अनेक राजकीय नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पटवर्धन (Shridhar Patankar)  यांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. सध्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाच्या चर्चा रंगवल्या आहेत. अशातच पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


ईडीच्या रडारवर असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांचे ठाकरे परिवाराशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. पाटणकरांशी केलेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का? असा सवालही सोमय्यांनी विचारला आहे. पण सोमय्यांनी ठाकरेंवर आरोप करताना उल्लेख केलेले नंदकिशोर चतुर्वेदी नेमके आहेत तरी कोण? जाणून घेऊयात... 


गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्यांकडून ठाकरे कुटुंबियांवर आरोपांचं सत्र सुरु आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर ईडीनं केलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा सोमय्यांनी ठाकरेंवर आरोपांचं टीकास्त्र डागलं आहे. त्यावेळी त्यांनी आणखी एक नवा आरोप ठाकरे कुटुंबियांवर केला. ईडीच्या रडारवर असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांचे ठाकरे कुटुंबियांशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आधी आदित्य, रश्मी आणि तेजस ज्या कंपनीत संचालक होते, त्यांच्या राजीनाम्यानंतर नंदकिशोर आणि रिटा चतुर्वेदींची त्या कंपनीत एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज कंपनीत नंदकिशोर आणि रिटा चतुर्वेदी डायरेक्टर आहेत. 2014 साली स्थापना झालेल्या या कंपनीत आदित्य आणि रश्मी ठाकरे संचालक होते. मार्च 2020 मध्ये ठाकरे कुटुंबाची कोमो स्टॉकमधून एक्झिट झाल्यानंतर चतुर्वेदी संचालक बनले. चतुर्वेदी आणि पुष्पक ग्रुपनंच ठाकरेंच्या मेहुण्याच्या कंपनीला विनातारण कर्ज दिल्याचा ईडीला संशय आहे. 


पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री परिवाराचा कोट्यवधींच्या घोटाळ्यात समावेश : किरीट सोमय्या 



किरीट सोमय्यांचा आरोप नेमका काय? 


किरीट सोमय्या यांनी म्हटले की, आदित्यने 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केलं नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावं, अशीही मागणी सोमय्या यांनी केली. शेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली.


सोमय्यांनी हवाल किंग असा आरोप केलेल्या नंदकिशोर चतुर्वेदींच्या कंपन्यांची यादी 



  • एशडाऊन इन्वेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी प्रा.लि. (11 ऑक्टो. 09 पासून संचालक)  

  • एनडी रिअल्टर्स अँड बिल्डर्स प्रा.लि. (22 मार्च. 2010 पासून संचालक) 

  • एनपार पॉवर जनरेशन प्रा.लि. (4 फेब्रु. 2010 पासून संचालक) 

  • एनपार होल्डिंग्ज प्रा.लि. ( 5 फेब्रु. 2010 ) 

  • नॅनकॉम इन्फ्रा प्रॉडक्ट्स प्रा.लि. ( 25 मे. 2012 पासून संचालक ) 

  • ब्रिजानंद सिक्युरिटीज प्रा.लि. (1 फेब्रु. 2014 पासून संचालक) 

  •  ग्रीन वॉटर रिसॉर्टस प्रा.लि. (26 फेब्रु. 2014 पासून संचालक) 

  • सिल्वर सँड बीच इन प्रा.लि. (26 फेब्रु. 2014 पासून संचालक) 

  • अरिंदम शेखर गारमेंटस मार्केटिंग प्रा.लि. (10 एप्रिल 2015 पासून संचालक) 

  • निरंजन हाऊसिंग प्रा.लि. (10 एप्रिल 2015 पासून संचालक)

  • आदित्य बुलियन्स अँड ब्रोकिंग प्रा.लि. (10 एप्रिल 2015 पासून संचालक)

  • मिलाप कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. (9 मार्च 2016 पासून संचालक) 

  • एमटीडी वॉकर्स ओव्हरसिज प्रा.लि. (1 नोव्हे. 2016 पासून संचालक) 

  • ताकशी बिल्डर्स प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • आदिप्ता इन्फ्रा प्रोजेक्ट्स, प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • मनीआईड मल्टिट्रेड प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • वुडी मल्टिट्रेड प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • हमसफर डिलर्स प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • एव्हांशी मर्कंटाईल प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • वत्सला ट्रेड प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 

  • प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रा.लि. (30 मार्च 2017 पासून संचालक) 


महत्त्वाच्या इतर बातम्या :