राज्यात यापूर्वी 2008 साली राज्यासह देशभरात ऐतिहासिक 72 हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे 82-82 लाखांपर्यंतचं कर्ज माफ झालं. राज्यातील मंत्रिमंडळात एका टॉपच्या मंत्र्याने स्वतःच्या भावाला कर्जमाफी मिळवून दिली, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर तो मंत्री कोण, अशी एकच चर्चा राज्यभर सुरु झाली.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
‘’कर्जमाफी ही खैरात होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनेचे नेतेच स्वतःहून बैठकीत बोलले. ज्यांना आवश्यक आहे, अशापर्यंतच कर्जमाफी पोहोचावी. 2008 साली पश्चिम महाराष्ट्रात 82-82 लाख कर्जमाफ झाले, नाव घेऊन कुणाला एक्स्पोज करणं माझा स्वभाव नाही, पण त्यावेळी महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये टॉप मिनिस्टर असणाऱ्याच्या सख्ख्या भावाला कर्जमाफी मिळाली. अशी कर्जमाफी होणार असेल, तर 100 रुपये आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अनेकांना समाधानी करायचं असेल तर ज्याला गरज नाही, ते रांगेतून बाहेर पडले, तर गरज असणारा आपोआप पुढे येईल’’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
VIDEO : चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले, ते खालील व्हिडिओमध्ये 7 मिनिटांपासून ऐकू शकता