Old pension Vs New Pension Scheme : नवी पेन्शन योजना (NPS) ऐवजी केंद्र सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना (UPS) आणली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी 24 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. UPS 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना UPS चा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना UPS किंवा NPS पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय असेल. राज्य सरकारची इच्छा असेल तर ते अंमलबजावणी करू घेऊ शकतात. राज्य कर्मचारी सामील झाल्यास सुमारे 90 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल.


जुन्या आणि पेन्शनमध्ये आहे तरी काय? जुनी पेन्शन का दिली नाही. या योजनेत सामील झाल्यास किती फायदा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.