मुंबई : देशातील सर्वात मोठी आणि विश्वासू तपास यंत्रणा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय सध्या एका वेगळ्याच संकटातून जात आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लगाम लावण्याच्या उद्देशाने अस्तित्त्वात आलेली ही संस्था स्वतःच भ्रष्टाचाराच्या संकटात आहे. सीबीआयने आपल्याच संस्थेतील विशेष संचालकांविरोधात लाच घेतल्याचा एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयमधील हा वाद क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या पदांचा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे क्रमांक एकचे अधिकारी मुख्य संचालक आलोक वर्मा आणि अस्थाना यांना तपास पूर्ण होईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आलंय.


देशपातळीवर सीबीआय आणि राज्य पातळीवर सीआयडी या सर्वात विश्वासू तपास यंत्रणा समजल्या जातात. देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेच्या वादादरम्यान राज्यात काम करणारी सीआयडी आणि सीबीआय यांच्यातील फरक समजून घेणं गरजेचं बनतं.

सीबीआय म्हणजे काय?

सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते.

1941 साली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट आणि 1963 ला सीबीआय म्हणून ओळख

संपूर्ण देश हे कार्यक्षेत्र आहे.

लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे, धोरणात्मक विभाग, विशेष गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग हे कार्यक्षेत्र

देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी

गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो.

राज्य सरकारच्या विनंतीवर राज्यातील प्रकरणांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते.

डीएसपीई म्हणजेच दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 1946 अंतर्गत तपासाचे अधिकार

सीबीआय संचालकांची नियुक्ती लोकपाल कायद्यानुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती करते.

सीआयडी म्हणजे काय?

सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट

राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस विभागातील ही यंत्रणा राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते.

1902 साली ब्रिटीश सरकारच्या काळात स्थापना

संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र आहे.

फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा आणि सीआयडी, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार

पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी केली जाते.

राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतं.

सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात.

सध्या महाराष्ट्र सीआयडीचे संचालक संजीव कुमार सिंघल आहेत.