Presidential Elections 2022: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दर्शवलाय. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर त्यांनी पक्ष टिकवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. याच कारणामुळं उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. 


उद्धव ठाकरे दररोज आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच आपल्या विभाग प्रमुख, आमदार आणि खासदार यांचीही वारंवार भेट घेताना दिसत आहेत.  उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या खासदारांशी चर्चा केल्यानंतर डीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मुर्मूला पाठिंबा देण्यामागं ठाकरेंनी काहीही कारण दिले असले तरी या निर्णयामागील खरे कारण काहीतरी वेगळेच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. सरकार कोसळल्यानंतर पक्षात पुन्हा फूट पडण्याच्या भितीनं ठाकरेंनी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय.


दरम्यान, मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतर खासदारांमध्ये वाद पाहायला झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान, अधिकतर खासदारांनी द्रोपदी मुर्मूला समर्थन देण्याची मागणी केली. तर, संजय राऊतांनी यशवंत सिन्हा यांना समर्थन देण्याचं मत मांडलं. त्यावेळी खासदार आणि संजय राऊत यांच्यातील वाद इतका पेटला की, संजय राऊत अर्ध्यातूनच बैठक सोडून निघून गेले. राऊतांच्या सल्ल्याकडं दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांना खासदारांच्या बाजून निर्णय घ्यावा लागला. या खासदारांना आपली बाजू सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छावणीत सामील होण्यासाठी ठाकरे यांना कोणतीही कारण द्यायचं नव्हतं. शिंदे यांच्या छावणीतही एनडीएचे उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीत. राज्यातील 6 महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. परंतु, यातील चार महानगरपालिकेतील अधिकतर नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवलाय. ज्यात ठाणे, नवी मुंबई यांच्यासारख्या मोठ्या महानगरपालिकांचा समावेश आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी सिमितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव या शिंदे गटात सामील झाले आहेत. एवढेच नव्हेतर लोकसभेत एकूण 19 खासदारांपैकी 10 खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यात वर्तवली जात आहेत. या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरही दावा ठोकू शकतात. यामुळं उद्धव ठाकरेंना पक्षामध्ये होणारी फूट रोखायची आहे. यामुळं त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. 


हे देखील वाचा-