Nanded News: गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या पावसानंतर, गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 510.30 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 

प्रमुख नद्यांना पूर... 

नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सखल भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.

गेल्या 24 तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस

अ.क्र. तालुका  24 तासांत झालेला पाऊस  एकूण पाऊस 
1 नांदेड 124.90 मिलीमीटर 528.30
2  बिलोली  127.90 513.80
3  मुखेड  79.30 480.30
4  कंधार 98.60 547.20
5  लोहा 121.80 505.90
6  हदगाव 164.50 164.50
7  भोकर 167.30 552.10
8  देगलूर 58.20 454.70
9  किनवट 100.30 503.40
10  मुदखेड 152.40 639.50
11  हिमायतनगर 183.10 668.20
12  माहूर 86.40 420.10
13  धर्माबाद 109.50 510.80
14  उमरी 151.30 593.00
15 अर्धापूर 115.80 490
16  नायगाव 136.20 451.70

महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Rains: पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स