Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये प्रचंड बदल (Weather Update) झालेला दिसत आहे. राज्यासह देशात (India) एकीकडे कडक ऊन पडत असल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) काही भागात पाऊस धो धो कोसळला आहे. राज्यात काही पुढील तीन दिवस काही ठिकाणी धो धो पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाने आज झोडपलं तर मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचं हवामान झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
सांगलीमध्ये गारांचा पाऊस -
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जालं आहे. काही भागात गारांचा पाऊस पडला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकाना तात्पुरता दिलासा मिळालाय. पण शेतकऱ्यांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. वाई, कोल्हापूर, साताऱ्यातही पावसाने झोडपलं आहे.
पुढील चार दिवस अवकाळीचा तडाखा -
ऐन कडाक्याच्या ऊन्हाळ्यामध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह विदर्भ, कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उष्णतेची लाट -
राज्यातील काही भागात पाऊस पडत असतानाच दुसरीकडे मात्र उष्णतेची लाट आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी कऱण्यात आलाय. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा सल्लाही देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. म्हणजे, दिवसा पाऊस कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी रात्रीचा उकाडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उकाडा वाढल्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
कधी ऊन, कधी पाऊस... नागरिक मात्र त्रस्त
ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यातच दुसरीकडे कोकण, ठाणे, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वादळवारा आणि गारपीटमुळे शेतकर्यांचं भारी नुकसान झाले आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत.