Washim : जिद्द मेहनत आणि चिकाटी असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते याचाच प्रत्येय वाशीमच्या कारंजाच्या एका व्यवसायाने हमाल  (वेठ  बिगारी)  काम करत असलेल्या चंद्रकांत जाधव यांनी  खरा करून दाखवलाय आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला गवसणी घातली त्या करिता  त्याच्या मुलांनी  हि त्याच पद्धतीने  साथ दिली आणि  नितेश चंद्रकांत जाधव  याला अभ्यासाच्या जोरावर नेव्ही मर्चंन्टमध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर पदाकरीता  निवड झाली.  


चांगले शिक्षण मिळून आपले  मुल उच्च शिक्षित व्हाव  हे प्रत्येक पालकांचं  स्वप्न असतं आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला पालक तयार होतात. त्यामुळे अलीकडच्या  दशकात  इंग्रजी शिक्षणाकडे पालकाचा  कल वाढलाय   त्यामुळे  शिक्षणाच बाजारीकरण होत असताना  मात्र असं असल तरी स्थानिक नगर पालीकाच्या  शाळेत. शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नाच्या  पंखाला मेहनतीची जोड देवून  भरारी घेऊ  शकतो हे   एका  जिद्दी बापलेकाने  दाखवून दिल  घरची हालाकीची परिस्थिती असताना वाशिम जिल्ह्यातील कांरजा मधील एका हमालाच्या  (वेठबिगारी ) काम करणाऱ्याच्या मुलाने नेव्ही मर्चंन्टमध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसनी घालुन जिद्द, चिकाटी मेहनतीला पर्याय नाही घालून दिला  आहे. चंद्रकांत जाधव  अस या  भाग्यवान बापाचं नाव. चंद्रकांत जाधव आपल्या  कुटुंबासह कांरजा येथील शिवाजीनगरातील  राहतात त्यांचा मुलगा नितेश चंद्रकांत जाधव याने नुकतीच इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर पदाची परीक्षा उत्तीर्ण केली असून येत्या जुन महिण्यात तो त्या पदावर रूजु होणार आहे.


नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कांरजा बाजारसमितीत हमालीचे कामा सह (वेठ बिगारी) काम करतात  त्यातून मिळणारी आर्थिक कमाई ही तोकडीच  त्यातून घर खर्चासह  प्रपंच चालवन जिकरीच असत.आई गृहिणी आहे. त्यांच्या घरची आर्थिक परीस्थिती तशी बेताचीच. मात्र वडिलांच स्वप्न मुलांनी शिकून नोकरी करावी यासाठी त्यांची धडपड कायम असायची नितेशने कांरजा येथिल न. प. शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर बी ई इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली आणि इतरांप्रमाणे शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकिय सेवेत नोकरी मिळणे कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने सप्टेंबर 2021 मध्ये ही परीक्षा दिली आणि त्यात 81 टक्के गुण संपादन केले.


आणि त्याच मिळवलेल्या  गुण संपदे  मुळे आता  नितेशला नेव्ही मर्चंन्टमधील या नेाकरीसाठी त्याला दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन मिळणार असुन जहाजावरील इलेक्ट्रिकची कामे त्याला करावी लागतील. यासाठी त्याला कोणाचेही मार्गदर्शन लाभले नसून त्याने इंटरनेटलाच मार्गदर्शक मानुन शिक्षण ते नेाकरी असा प्रवास पुर्ण केलाय. कांरजातील नितेश जाधवची जिद्द, चिकाटी व मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारून शिक्षणाची वाट धरल्यास नोकरी मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही एवढे नक्कीच. त्यांच्या  कुटुंबाच्या  जिद्दीची पंचक्रोशीत  चांगली चर्चा  आहे. त्यामुळे  इंग्रजी शाळेपेक्षा  जिल्हा परिषदची शाळा कमी नाही  हे म्हणण्याची वेळ आली मात्र त्या साठी  जिद्द चिकाटीची  गरज आहे. 


संबंधित बातम्या