Washim News : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) सध्या डीझल चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. तर मगील पंधरा दिवसांमध्ये डिझेल चोरी करणाऱ्या तीन टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नागपूर ते मुंबई असलेल्या समृद्धी महामार्गावर वाशिम (Washim) येथे महामार्ग पोलिसांनी (Highway Police) ही कारवाई केली आहे. पण काल रात्री पुन्हा ही डीझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. मात्र काळाने या टोळीवर घात केला. गुरुवारी रात्री मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वाशिम जवळ एका कंटेनरच्या धडकेत डिझेल चोरी करणाऱ्या या टोळीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 


नेमकं काय घडलं?


गुरुवारी रात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा डिझेल चोरीची टोळी सक्रिय झाली होती. या टोळीमध्ये तिघांचा समावेश होता. हे तिघेजण डिझेलची चोरी करुन एका गाडीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला  मागून एका कंटनेरने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण यामध्ये गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला होता. त्यामुळे पोलिसांना गाडीची देखील ओळख पटवण्यास कठिण झाले. 


दरम्यान या गाडीमधून पोलिसांनी जवळपास  11 डीझेल केन, एक तलवार, मोबाईल फोन आणि विविध क्रमांकाचे दोन नंम्बर प्लेट  आढळले. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून सध्या जखमींची चौकशी करण्यात येत आहे. तर जखमींकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांसह या प्रकरणामध्ये वाशिमच्या मालेगाव पोलिसांकडूनही तपास करण्यात येत आहे. 


तर सध्या पोलिसांकडून या टोळीजवळ सापडलेल्या गाडीचा तपास सुरु आहे. त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाची आहे आणि यामागचा खरा सूत्रधार कोण हे प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहेत. अजून किती ठिकाणी अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत याचा तपास देखील वाशिमच्या मालेगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर सुरु असलेलं हे डिझेल चोरीचं सत्र कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून अशा टोळींवर कडक निर्बंध घालण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


Indapur Accident : विहिरीत अडकलेल्या 'त्या' चार पैकी तीन मजुरांचे मृतहेद सापडले, आणखी एकाचा शोध सुरू