मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट असताना वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी गंभीर असून संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.


संजय राठोड  यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमली होती. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमले होते. तिथे कोरोना काळात जे नियमांचं उल्लंघन झालं याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्थेबाबत कठोर आहेत. कुणी आपला असले तरी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार त्यांना सोडणार नाही. चुकीचे असतील त्यांच्या कायदेशीर कारवाई होईल, असं संजय राऊत म्हणाले.


Sanjay Rathod | संजय राठोड का आवडे सर्वांना?


शरद पवारांची नाराजी?


पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसकडूनही याबाबत चौकशीची मागणी होत आहे. कालची गर्दी करायला नको होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर तरी पोहरादेवी येथे गर्दी टाळायला हवी होती. याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करुन विषय संपवला पाहिजे कोणताही संभ्रम नकोय. मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला; शरद पवारांची नाराजी


पोहरादेवी गर्दी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर


एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती.


Sanjay Rathod | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं, चौकशीतून सत्य समोर येईल : संजय राठोड


Sanjay Rathod प्रकरणी शरद पवार नाराज, तपास पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहण्याची भूमिका : सूत्र