वर्धा : रोज पेट्रोल टाकताना खिशाला चाप बसत असेल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होत आहे. एक अशी गाडी जी इको-फ्रेण्डली आहेच, मात्र त्यासोबतच खिशाला परवडणारीही आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कमाल
वर्ध्यातील शंकर प्रसाद अग्निहोत्री कॉलेजच्या अभियांत्रिकी विभागात शेवटच्या वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
अशी आहे गाडी!
आज गाडीशिवाय कुठलंचा काम होत नाही आणि गाडी म्हटलं की, खर्च आलाच. तो पेट्रोलचा असतो किंवा गाडीचा व्यवस्थापनाला खिसा रिकामा करणारा असतो. पण वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेला पर्याय एकदम स्वस्त आहे. खिशाला परवडणारा आहे. कारण या गाडीला पेट्रोल लागत नाही, गाडी धावते ती म्हणजे हवेवर. गाडीचे सोलर छत ही गरज पूर्ण करते. तसेच हे दोन पंखे फिरायला लागले की उर्जा तयार होते. एवढंच काय गाईचे चाकं फिरयला लागले की तिथेसुद्धा ऊर्जा तयार होते. तीनही पद्धतीने नैसर्गिक उर्जा साठवण्याच काम गाडीला जोडलेली बॅटरी करते. मग काय, गाडी रस्त्यावर धावाण्यासाठी तयार, तेही पेट्रोल पंपावरील गर्दीत उभं न राहता आणि खिशाला चाप न लावता
ही गाडी सध्या एका मर्यादित स्वरूपात काम करते. मात्र, यावर जर का आवाका वाढवून काही महत्त्वाचे बदल केल्यास, संशोधन केल्यास आणखी गतीने आणि आणखी मोठ्या स्वरूपात रस्त्यावर धावू शकेल, असं मत मंगेश बाहुटे यांनी व्यक्त केलं आहे.
विद्यर्थ्यांनी गरजा ओळखून त्या पद्धतीने नव-नवीन उपकरणं किंवा प्रोजेक्ट तयार करावे, जेणेकरून लोकांचा गरजा पूर्ण होण्यास मदत मिळेल, अशा गोष्टींना आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मत प्राचार्य राजकिशोर तुघानायत यांनी व्यक्त केलं.
आज पेट्रोलचा विचार जर आपण केला तर नैसर्गिक उर्जेचा वापर अधिकाधिक करुन गरजा पूर्ण करणे, ही काळजी गरज झाली आहे. यामुळे या शोधांमुळे पर्यावरणाचं रक्षण होईलच आणि मानवी गरजाही पूर्ण होण्यास मदत होत असल्याचं यावर विचार करणे, हे महत्वाचंच ठरेल.