Wardha Crime: देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आलीय. वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यातील सिल्ली गावात एका 55 वर्षाच्या व्यक्तीनं तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं घटना उघडकीस आलीय. या तिन्ही मुलींचं वय 8 वर्षांहून कमी आहे. याप्रकरणी गिरड पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. 


केशव बावसु वानखेडे (वय, 55) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा सावरी चंद्रपूरच्या चिमुर तालुक्यातील माकोना सावरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार 18 फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास सिल्ली गावात तीन मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्यावेळी टिन पिप्याचे काम करण्यासाठी गावात आलेल्या नराधम केशव बावसु वानखेडे यांने या मुलींना पैसे दिले. तसेच त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, यातील एका मुलीनं आरोपीकडून आपली सुटका करीत पळ काढला. तसेच आपल्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला. या घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नराधम दोन चिमुकल्यांवर अत्याचार करताना आढळून आला. यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून गिरड पोलिसांच्या ताब्यात दिलं.


घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली आहे.पोलिसांनी आरोपी विरोधात 376 (अ) (ब), 354, 353 (अ), 354 (ब),भादवीसह 4,6, 8, 10 बाल लैंगिक अत्याचार अनवय गुन्हा दाखल केलाय. तिन्ही पिडीत मुलींना वैद्यकीय तपासणी पाठविण्यात आलंय. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात साय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha