Ramdas Athawale : हे सरकार तूर्तास तरी पडणार नाहीच आणि पडलं तर त्यावर आम्ही बोलायला तयार आहोतच असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी, सीबीआय या यंत्रणा स्वतंत्र कार्य करतात. त्यांचा सरकारशी संबंध नाही. सरकार पाडायचं असतं तर सगळ्या आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी चौकशी लावली जाते, यात कोणतंही तथ्य नसल्याचे आठवले म्हणाले.
सध्या राज्यात सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ते थांबवायला हवं आणि विकासाकडे लक्ष द्यायला हवं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी कळवणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. राज्यात महाविकासआघाडीला सत्ता मिळालेली आहे. त्यांनी या सत्तेचा वापर एकमेकांवर आरोप करण्यात घालवू नये. त्यापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी करायला हवा. आता हा वाद मिटवावा, एकमेकांची बदनामी करू नये असेही आठवले यावेळी म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीचे जे बाहेर काढायचे ते काढावे. ईडी संजय राऊत यांच्याबद्दल जे करायचं ते करत आहे. यात सरकारचा कोणताही संबंध नाही. एका रात्रीत 19 बंगले गायब झाले, या किरीट सोमय्यांच्या आरोपाबद्दल मला काही माहिती नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतचं असतात. मात्र, हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे असे आठवले यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे मित्र आहेत. त्या दोघांचा मी मित्र आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माहाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आठवले म्हणाले. सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करावा असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: