Warkari Dindi Buldhana : राज्य सरकारनं (State Govt) प्रत्येक वारकरी दिंडीला (Warkari Dindi) 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाने (Govt) हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विश्व वारकरी सेनेनं (Vishwa Warkari Sena) केली आहे. शासनाला जर वारकऱ्यांना आणि दिंडीला मदतच करायची असेल तर वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर तो पैसा खर्च करावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज थेटे यांनी केलीय.


वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर पैसा खर्च करावा


शासनाच्या 20000 रुपये मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरस पूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्काम वारी पासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. त्यामुळं शासनाने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये मदतीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गणेश महाराज थेटे यांनी केली आहे. शासनाला जर वारकऱ्यांना आणि दिंडीला मदतच करायची असेल तर वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर तो पैसा खर्च करावा जेणेकरुन वारकऱ्यांना वारी करणे सहज जाईल असे आवाहन गणेश महाराज थेटे यांनी केल आहे. त्यामुळे शासनाने तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Sant Nivruttinath Palkhi : नाशिक झालं विठुमय! संत निवृत्तीनाथ पायी दिंडी दोन मुक्कामानंतर शहरात दाखल, प्रशासनाकडून स्वागत