Beed News : राजकीय वैमनस्यातून दोन गटात भररस्त्यात झालेल्या वादात दोन्ही गटाचे 11 जण जखमी झाले आहेत. गावातील नागरिकांनी वाद सोडविल्यानंतर जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये नऊ जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळावरून लाकडी काठ्या, खोरे आणि कोयते जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. दरम्यान, परळी ग्रामीण पोलिसांचा गावात मोठा बंदोबस्त तैनात होता.


बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था मागील काही दिवसांपासून ढासळताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमुळे बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा काही दिवसापूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये केली होती. एवढेच नाही तर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडला असतांना जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. चोरी, दरोड, लुटमार यासह अवैध धंदे सुरु असताना आज दुपारी धर्मपुरीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर राजकीय पूर्व वैमन्यासातून दोन गट समोरासमोर आल्याने झालेल्या मागणीत 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.  रस्त्यावरील व्यापायांनी आपआपली दुकाने देखील बंद केली. एखाद्या फिल्मी फाईटप्रमाणे दोन्ही गट हातात काठ्या कोयते - खोरे घेऊल समोरासमोर भिडले.  राजकीय वातावरण तापल्यामुळे दोन्ही गट समोर आल्याने मोठा राडा याठिकाणी झाला. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या राड्यानंतरक ग्रामीण पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha