Nagpur News नागपूर : राज्यातील सरकारी तिजोरीची उधळपट्टी करण्याचे काम सध्या सुरु आहे. नागपूरात लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम झाला. या एका इव्हेंटसाठी 4 कोटींचा खर्च सुरु आहे. दुसरीकडे नागपूरात जानेवारीपासून आत्तापर्यंत 524 घटना अत्याचाराच्या घडल्या आहेत. असे असले तरी थातुरमातूर कारवाई केली जात आहे. 2837 गुन्हे एक जानेवारी ते 1 ॲागस्टपर्यंत झाले आहेत. त्याची लाज या सरकारला नाही.


महिलांवरील अत्याचार रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलंय. मात्र असे इव्हेंट करुन सरकारी तिजोरीची उधळपट्टी सुरु असल्याने राज्यातील चोरांचे अन् डाकूचे राज्य जावे, ही श्रींची इच्छा असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर घणाघात करत निशाणा साधला आहे. ते नागपूर (Nagpur News) येथे बोलत होते.


आमचे सरकार आल्यावर तानाजी सावंत कुठे असेल हे कळेल


नुकतेच वरोरा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. यात दोन शिक्षकांवर कारवाई झाली. पडीत मुलगी ही एका मागासवर्गीय समाजातून येते तर धनंजय पेरके हा आरोपी एबीव्हीपीचा चंद्रपूर जिल्हा अघ्यक्ष आहे. बदलापूरची घटना घडली त्याच विचाराची वरोरा येथील शाळा आहे. त्यामुळे महिला सुरक्षेकडे या सरकारचं दुर्लक्ष असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या वतीने उद्या राज्यात सरकार विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. मात्र उद्याच्या या मोर्चाला परवानगी दिली नाहीये. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी.


कोलकात्यात भाजप मोर्चा काढते, मात्र आम्ही इथे दोन चिमुकलीवर अत्याचार झाला त्यासाठी मोर्चा काढला तर त्याला हे लोक राजकारण म्हणतात. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना पैसे देतात तर मुलांना का नाही? चोर चोर मावसभाऊ सत्तेसाठी वाटून खाऊ  असे म्हणत आता पोट भरल्यावर गणेश हाके बोलत आहे. सोबतच तानाजी सावंतांनी 3 हजार कोटींचा भ्रष्ट्राचार केला. आमचे सरकार आल्यावर तानाजी सावंत कुठे असेल हे कळेल, असे म्हणत  विजय वडेट्टीवारांनी सरकारला इशाराही दिला आहे. 


चुकलेल्या निर्णयाचे भोग अजित पवार भोगत आहेत 


अजित पवार यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्यांची आम्हाला कीव येते. आम्ही 125 जागा दिल्या होत्या, आता महायुती त्यांना 60 जागा देत आहेत. आपले पाप झाकून लाडकी बहीण योजना आणून सरकारला मत मिळवायचे आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एक जागा मिळाली, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पोटशूळ उठला आहे. हिस्सेदार वाढले तर त्यात वाटा नको, पुन्हा सत्ता आली तर हिस्सेदार वाढतील म्हणून अजित पवारांना दूर करायचे आहे. चुकलेल्या निर्णयाचे भोग 60 जागांच्या निमित्याने अजित पवार भोगत आहे. जितक्या जास्त जागा भाजप लढले तितका जास्त फायदा काँग्रेसला होईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवारांनी बोलताना व्यक्त केलाय. 


हे ही वाचा