Ladki Bahin Yojana : या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात आज (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ही उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित असून पेंडोलमध्ये बसायला जागा शिल्लक नाही. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली आहे.
1 कोटी 59 लाख लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात लाभ देण्याची देशातील सर्वात मोठी योजना
आदिती तटकरे म्हणाल्या, 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.
दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही, अशी वल्गना आमच्या मविआचे नेते करत होते
देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजना सुरू झाली तेव्हा योजना अमलात येणार नाही, दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही, अशी वल्गना आमच्या महाविकास आघाडीचे नेते करत होते. महिलांना विचारा खात्यात पैसे पोहोचले की नाही. महिलांनो सांगा लाडकी बहीण आणि इतर सर्व थेट लाभाच्या योजना सुरू ठेवायच्या की नाही? बहिणींनो तुम्ही म्हणता योजना सुरू ठेवा. मात्र काँग्रेस पक्षाचे अनिल वडपल्लिवार हे कोर्टात गेले आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व योजना बंद करण्याची मागणी केली आहे.
हे तेच अनिल वडपल्लीवार आहे, जे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते. ते विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. तसेच तेच अनिल वडपल्लीवार सुनील केदार यांचे ही खास मित्र आहे. त्यांनी योजना बंद करण्याची मागणी कोर्टात केली आहे. बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ इथे उभा आहे, न्यायालयात या योजनांवर गदा येऊ देणार नाही. आम्ही मोठ्या पैकी मोठा वकील लावून प्रकरण लडवू आणि योजना बंद पडू देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या