नागपूर : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तुम्हीही भाजपमध्ये जाणार का असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण काही चिल्लर नेता आहे का? असा प्रतिसवाल विचारला.
अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विश्वजीत कदम, अंतापुरकर जवळगावकर, अमित पटेल आणि इतर दोन-तीन मोठे नेते तात्काळ राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी काही चिल्लर नेता आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (Ashok Chavan Resigns)
सकाळी अशोक चव्हाणांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पण पाठवलेला आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडेही राजीनामा पाठवला ही माहिती आता मिळालेली आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्राला देशाला ओळख आहे. ते काँग्रेसमध्ये होते आणि अचानक त्यांनी राजीनामा दिला. माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.
याच्यामागे निराशा किंवा तसे काही असल्याचं दिसत नाही. पक्षा्च्या अनेक बैठकांमध्ये ते सहभागी झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते हजर होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून तसं काही दिसून आलं नाही. मात्र एक आहे की सातत्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून त्याना बदनाम करण्याचं काम सुरू होतं.
त्याही पलीकडे जाऊन शासकीय यंत्रणेचा दबाव होता का? ते नेमकं कशामुळे गेले, ते आज तरी माहिती नाही. मला तर कुठेही नाराजी दिसली नाही. गेले काही वर्षे त्यांच्या बतच आम्ही काम करतो. अशा स्थितीतून अचानक आलेला आजचा राजीनामा धक्का देणारा आहे.
भाजप जितक्या वेळा पक्ष फोडेल, त्याचं नुकसान भाजपलाच होणार आहे. लोकांना हे रुचत नाही वारंवार पक्ष फोडणं, माणसं फोडणं. तुम्ही पक्ष फोडाल तर लोकदेखील तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाहीत.
ही बातमी वाचा: