उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. तोपर्यंत भाजपने अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसं झाल्यास भाजपचा पाचवा उमेदवार पृथ्वीराज देशमुख आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळेल.
प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 24 मतांची गरज आहे. अशा परिस्थितीत निवडणूक लागली तर मतांची जुळवाजुळव करायला भाजपला शिवसेनेची साथ लागेल आणि घोडेबाजाराला ऊत येईल.
11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल.
कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
भाजपकडून यांची नावं जवळपास निश्चित : भाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), पृथ्वीराज देशमुख
शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे
काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा
राष्ट्रवादी काँग्रेस -
या सदस्यांचा कार्यकाळ संपणार
भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
राष्ट्रवादी मोठा पक्ष
सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजप विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजप विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद बलाबल -
राष्ट्रवादी काँग्रेस : 22
काँग्रेस : 19
भाजप : 17
शिवसेना : 9
जदयू : 1
शेकाप : 1
रिपाइं : 1
अपक्ष : 7
रिक्त : 1
एकूण : 78