Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यानी गुन्हेगाराकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलाय. मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त 30 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांवनर 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. याचे पुरावा शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. आपले मंत्री काय करतात हे पवारांनाही कळू द्या, असेही म्हटलेय.
मुंबईला घायाळ करणाऱ्या गुन्हेगाराकडून जमीन विकत कशी घेतली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केल. फक्त ही एकच नाही. अन्य चार मालमंत्तामध्ये अंडरवर्डचा सहभाग आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. त्यामुळेच प्राईम लोकेशनची जमीन मलिकांना स्वस्तात मिळाली. ही जमीन विकत घेताना स्टॅम्प ड्युटींमध्येही घोटाळे झाल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार आहेत. फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला नवाब मलिक काय प्रत्युत्तर देतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे, सरदार शहाब अली खान. हे 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हे उपस्थित होते. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हे सहभागी होते."
फडणवीसांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
टाडाच्या आरोपींकडून एखाद्या मंत्र्यानं जमीन कशी विकत घेतली?
फक्त एकच नाही, तर चार जागांमध्ये अंडरवर्ल्डचा संबंध
स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठीही घोटाळा
मलिकांचे अंडर्ल्डशी संबध, शरद पवारांकडे पुरावे देणार
मलिकांशी वैयक्तिक दुश्मनी नाही
शाह अली खान आणि सलीम पेटल 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी
बॉम्बस्फोट आरोपीकडून मलिकांनी जमीन स्वस्तात खरेदी केली
पुराव्याशिवाय बोलत नाही
मुंबईला घायाळ करणाऱ्यांकडून जमीन कशी विकत घेतली?