Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला (Akola) बुलढाणा (Buldhana)-वाशिम (Vashim) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे. 

निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

नागपुरात भाजपचं पारडं जड 

नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. नागपूरात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचं वर्चस्व दिसत आहे. त्यामुळे नागपूर विधानपरिषद निवडणूक ही चुरशीची होणार आहे. 

नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार होते. परंतु निवडणुकीला काही तास शिल्लक असताना कॉंग्रेसने भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत.

अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेवर कोणाचं वर्चस्व? 

विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून  देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागणार आहे. 
  
अकोला-बुलढाणा-वाशिममधील जिल्हानिहाय मतदार

जिल्हा मतदार 
अकोला 287
वाशीम 168
बुलढाणा 367

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा