नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे.  नागपूरात उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.


नागपूरमधील गीरीश व्यासांच्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीची  रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने  चांगलीच कंबर कसलीये. निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान तर निकाल 14 डिसेंबरला जाहीर होणार आहे.


नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार होते. परंतु निवडणुकीला काही तास शिल्लक असताना कॉंग्रेसने  भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबधित बातम्या :
निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर 
MLC Elections : काँग्रेसकडून छोटू भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी, बावनकुळेंविरोधात लढणार
'चंद्रशेखर बानकुळेंनी मला गंडवलं, 34 वर्ष साथ, तरीही पक्षाकडून अन्याय, आता राम राम करतोय', विदर्भात बड्या नेत्याचा भाजपला रामराम