Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. नागपूर मतदार संघात संध्याकाळपर्यंत 98.93 टक्के मतदान तर विधान परिषदेची अकोला-वाशिम-बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यात 98.30 टक्के मतदानाची नोंद झाली.
विधान परिषदेची अकोला-वाशिम-बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यात 98.30 टक्के मतदानाची नोंद झाली. या तीन जिल्ह्यातील एकूण 822 पैकी 808 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. तर नागपूर मतदार संघ निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. पाच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
नागपुरात भाजपचं पारडं जड
नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. नागपूरात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेवर कोणाचं वर्चस्व?
विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नागपूर विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलला
- निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर
- MLC Elections : काँग्रेसकडून छोटू भोयर यांना विधानपरिषदेची उमेदवारी, बावनकुळेंविरोधात लढणार
- 'चंद्रशेखर बानकुळेंनी मला गंडवलं, 34 वर्ष साथ, तरीही पक्षाकडून अन्याय, आता राम राम करतोय', विदर्भात बड्या नेत्याचा भाजपला रामराम