Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election Result) निकालानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात राडा झालाय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये खासदार निलेश लंके (MP Nilesh lanke) यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना घडलीय. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे (Rahul Zhaware) यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. 


पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण केली आहे. तसेच त्यांची गाडी फोडून टाकली आहे. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हा राडा झाला आहे. अद्याप हा हल्ला नेमका कोणी केला याबाबतची माहिती मिळाली नाही. लंके समर्थक राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीनंतर पारनेर पोलीस ठाण्यात मोठा जमाव आला आहे. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करत  कठोर करावाईची मागणी केलीय. लंके समर्थक आक्रमक झालेत. त्यामुळं पारनेर पोलीस ठाण्यासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.


विखे समर्थक विजय औटी यांच्याकडून राहुल झावरे यांना मारहाण, शरद पवार गटाचा आरोप


दरम्यान, सुजय विखे पाटील यांचे समर्थक विजय औटी यांच्याकडून राहुल झावरे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलाय. विखे पाटलांमध्ये पराजय पचवण्याची ताकद नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे फाळके म्हणाले. याबाबत गृहमंत्र्यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून करावाई करण्याची मागणीही त्यांनी केलीय. तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा फाळकेंनी दिलाय. 


अहमदनगर लोकसभेच्या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेची बाजी


अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक (Ahmednagar Lok Sabha Election) ही अत्यंत अटीतटीची झाली. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होती. राज्याचे महसूल आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृ.ण् विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी (Sujay Vikhe) दुसऱ्यांदा भाजपचे तिकीटावर निवडणूल लढवली. त्यांच्याविरोधाक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभेच्या मैदानात होे. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेनी विजय मिळवला आहे. त्यांनी सुजय विखे पाटलांचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके जवळपास 29317 मतांनी विजयी झाले आहेत. 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल काय?


या लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात 66.61  टक्के मतदान झाले होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अहमदनगर शहर, श्रीगोंदा, पारनेर ,शेवगाव- पाथर्डी कर्जत- जामखेड, राहुरी (काही भाग) असे विधानसभा मतदारसंघ आहेत. दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (NCP) 4, भाजपचे 2 आणि विधान परिषदेवर भाजपचे 1 असे आमदार आहेत. एकूणच बघितलं तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बलाबल जास्त दिसून येते. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने राष्ट्रवादीतील दोन आमदार हे अजित पवार (Ajit Pawar) गटात गेले असून दोन आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की