अमरावती : संपूर्ण देश सध्या ज्या भयंकर आणि जीवघेण्या रोगाशी महायुद्ध खेळत आहे, अशा कोविड-19 म्हणजेच कोरोनाने सध्या सर्वांचं जगणं मुश्किल केलं आहे. अशा परिस्थितीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सरकारने लॉकडाऊन लागू केल्यामुळे संपूर्ण मंदिरे, मशिदी मोठमोठे हॉटेल्स, कंपन्या सर्व बंद केलं आहे. अशातच दरवर्षी प्रमाणे गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या आनंद सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो, असा नयनरम्य सोहळा म्हणजे पंढरपूरचा आषाढी यात्रा सोहळा. जिथे जाण्यासाठी प्रत्येक वारकरी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करीत पालखीमध्ये सहभाग घेत असतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा हा रद्द करण्यात आला आहे. 29 मे रोजी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, मानाच्या सहा पालख्यांना हेलीकॉप्टर, विमानाने किंवा वाहनाने पंढरपूरला पालखीतील पादुका आणि काही वारकरी नेण्याची परनावागी देण्यात आली आहे. पण या सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा नाम उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विदर्भातील वारकरी मंडळीमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.


पाहा व्हिडीओ : पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी वज्रलेपाची प्रक्रिया | स्पेशल रिपोर्ट



प्रामुख्याने विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुक्मिणी माता यांची पालखी जर पंढरपूरला दाखल झाली नाही, तर पाडुरंगाचे दर्शनसुद्धा अपूर्ण मानावे लागेल असा विदर्भातील वारकऱ्यांचा भाव आहे. कारण दरवर्षी पौर्णिमेच्या दिवसाला रुक्मिणी मातेची पालखी पाडुरंगाच्या मंदिरात, मंडपामध्ये नेण्यात येत असते आणि भगवंतातर्फे आई रुक्मिणी मातेला साडी चोळी देऊन बोळवन करण्यात येते. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेण्यात येतात आणि भगवंताचे दर्शन करून आशीर्वाद देण्यात येते. त्याचप्रमाणे रुक्मिणी माता संस्थान, कौंडण्यपूर मठ पंढरपूर येथील मठातून दररोज पांडुरंगाला नैवद्यसुद्धा देण्यात येतो. यासर्व परंपरा 425 वर्षापासून सुरु आहेत. या परंपरेला खंड पडू नये याकरिता श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर कमिटी आणि युवा विश्व वारकरी सेनेतर्फे प्रशासनला असं निवेदन देण्यात आले कि, विदर्भातील फक्त पाच पालख्या प्रत्येक पालखीसोबत पाच वारकरी हेलीकॉप्टर, विमानाने किंवा एस.टी बसने पंढरपूरला नेण्यात यावे. पंढरपूरला येण्याऱ्या पालख्यांमधील फक्त 25 वारकरी सोशल डिस्टन्सिंग ठेवून, तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करून वारी करतील आणि परततील, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.


श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानने सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवत रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी असून पालखीला पंढरपूर जाण्यासाठी परवानगी मिळालीच पाहिजे, अशा निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी केली आहे. यासंदर्भात मंदिर कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव अंबाळकर आणि विश्वस्त अतुल ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया दिली.


महत्त्वाच्या बातम्या : 


यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी