देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. येत्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज, तर 13 जूनपर्यंत मुंबईत मान्सूनच्या पावसाची शक्यता
2. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेन सुरु करा, राज्य सरकारची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी; कल्याण-डोंबिवली, वसई-विरारवरुन आजपासून एसटी सुटणार
3. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र विदुषकाची कमी, महाराष्ट्रातील सरकारला सर्कस संबोधणाऱ्या संरक्षण मंत्री राजथान सिंह यांना शरद पवार यांचं उत्तर
4. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 90 हजारांवर; काल दिवसभरात 2259 नवे रुग्ण तर 1663 जण कोरोनामुक्त, एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 51 हजार पार
5. कोरोनावरील लसीची वाट न पाहता प्रत्येकाने फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम केलं पाहिजे, आयसीएमआरचे उपसंचालक डॉ रमण गंगाखेडकर यांचं वक्तव्य
6. कोरोनाच्या भीतीने पेपर टाकणाऱ्या मुलांना ठाण्यातील सोसायट्यांमध्ये मज्जाव, वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनची पोलिसांकडे धाव, गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
7. कोरोना संकटातही सतत गैरहजर राहणाऱ्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना, जिल्ह्यात 24 तासात 116 कोरोनाबाधितांची नोंद
8. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून टास्क फोर्सची निर्मिती, वॉर्ड स्तरावर काम करुन पोलीस आणि महापालिकेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न
9. भारत आणि चीन सीमा वादप्रश्नी आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा मेजर जनरल स्तरावरील बैठक होण्याची शक्यता, एलएसीवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न
10. कोरोनामुळे आयसीसीच्या नियमांमध्ये बदल, लकाकीसाठी चेंडूला लाळ, थुंकी लावण्यास बंदी, खेळाडूला लक्षणं आढळल्यास रिप्लेसमेंट मिळणार