Vice President Election 2022 : उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 19 जुलैपर्यंत चालणार आहे.  या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीबाबत संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेऊयात... 

भारतीय राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी खालील तारखा निश्चित  केल्या आहेत. -

19 जुलै 2022 (मंगळवार), नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख;
20 जुलै 2022, (बुधवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी
22 जुलै 2022, (शुक्रवार), नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 
6 ऑगस्ट, 2022, (शनिवार), या  दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान घेतले जाईल.

उमेदवारी अर्ज कुठे जमा करायचा?
खोली क्रमांक 18, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली येथील कार्यालयात किंवा ते  अपरिहार्य कारणामुळे  गैरहजर असल्यास, सहाय्यक निवडणूक अधिकारी  सहसचिव पी.सी त्रिपाठी आणि लोकसभा सचिवालयाचे संचालक राजू श्रीवास्तव यांच्याकडे सदर  कार्यालयात सकाळी 11 ते  दुपारी 3 या वेळेत   कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सादर करता येतील.  मात्र 19 जुलै 2022 नंतर सादर करता येणार नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची फी किती?
प्रत्येक उमेदवाराने फक्त पंधरा हजार रुपये जमा करावेत किंवा जमा केले जाऊ शकतात .ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे  नामनिर्देशनपत्र  सादर करताना रोख स्वरूपात किंवा आधी सरकारी कोषागारात जमा केली जाऊ शकते. आणि नंतर  नामनिर्देशनपत्रासोबत  ही रक्कम जमा केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. 

निवडणूक प्रक्रिया कशी असते?
लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत, ज्यामध्ये नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी निर्वाचित मंडळातील संसदेच्या दोन्ही सभागृहांतील 788 सदस्यांचा समावेश आहे. 

कोण करु शकते मतदान?
राज्यसभा सदस्य - 233
राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य - 12
लोकसभा सदस्य - 543 
एकूण - 788
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजप प्रणित एनडीएकडे आघाडी आहे. 
 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते. दोन टर्म ते या पदावर राहिले. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही पाच वर्षांसाठी असतो. ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. आतापर्यंत झालेले उपराष्ट्रपती... 

क्रमांक

नाव

कधीपासून

केव्हापर्यंत

1

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

13 मे, 1952

12 मे, 1962

2

झाकिर हुसेन

13 मे, 1962

12 मे, 1967

3

व्ही व्ही गिरी

13 मे, 1967

3 मे, 1969

4

गोपाल स्वरूप पाठक

31 ऑगस्ट, 1969

30 ऑगस्ट, 1974

5

बी.डी. जत्ती

31 ऑगस्ट, 1974

30 ऑगस्ट, 1979

6

मोहम्मद हिदायत उल्लाह

31 ऑगस्ट, 1979

30 ऑगस्ट, 1984

7

आर. वेंकटरामण  

31 ऑगस्ट, 1984

24 जुलै, 1987

8

शंकर दयाल शर्मा  

3 सप्टेंबर, 1987

24 जुलै, 1992

9

के आर नारायणन 

21 ऑगस्ट, 1992

24 जुलै, 1997

10

कृष्ण कांत

21 ऑगस्ट, 1997

27 जुलै, 2002

11

भैरोव सिंह शेखावत

19 ऑगस्ट, 2002

21 जुलै, 2007

12

हमीद अन्सारी  

11 ऑगस्ट, 2007

10 ऑगस्ट, 2017

13

व्यंकय्या नायडू

11 ऑगस्ट, 2017

11 ऑगस्ट 2022

 

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, कधी झाली, कोण जिंकले, कोण हरले?

क्रमांक

वर्ष

Date of Poll

विजेता

मते

उपविजेता

मते

1

1952

12-05-1952

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (बिनविरोध)

2

1957

11-05-1957

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (बिनविरोध)

3

1962

07-05-1962

झाकिर हुसेन

568

एन.सी सामंतसिंहर

14

4

1967

06-05-1967

व्ही व्ही गिरी

483

मोहम्मद हबीब 

193

5

1969

30-08-1969

गोपाल स्वरूप पाठक

400

   

6

1974

27-08-1974

बी.डी. जत्ती

521

एन ई होरो

141

7

1979

27-08-1979

मोहम्मद हिदायत उल्लाह (बिनविरोध)

8

1984

22-08-1984

आर. वेंकटरामण  

508

   बी.सी. कांबळे

207

9

1987

07-09-1987

शंकर दयाल शर्मा  (बिनविरोध)

10

1992

19-08-1992

के आर नारायणन 

700

काका जोगिंदर सिंह

2

11

1997

16-08-1997

कृष्ण कांत

441

सुरजित सिंह

273

12

2002

12-08-2002

भैरोव सिंह शेखावत

454

सुशिलकुमार शिंदे

305

13

2007

10-08-2007

हमीद अन्सारी

455

नजमा ए हेप्तुल्ला

222

14

2012

07-08-2012

हमीद अन्सारी

490

जसवंत सिंह

238

15

2017

05-08-2017

व्यंकय्या नायडू

516

गोपालक्रृष्ण

244