मुंबई : गेल्या 15 दिवसापूर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक घटलीय. यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांची वाढ (Vegetable prices) झालीय. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणात वापरण्यात येणारी कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. कोथिंबीरच्या एका जुडीला 50 ते 60 रुपये दर मिळत आहे. किमान महिनाभर तरी पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार आहे.
अवकाळी पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झाली. परिणामी कोथिंबीर सर्वात महाग लागत आहे. पालेभाज्यांच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली. किरकोळ बाजारात कोथिंबरीच्या एका जुडीच दर 40 रुपये आहे. मेथीचे दर देखील 50-60 रुपयांपर्यंत गेले आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पालेभाज्या लागवडीस किमान महिनाभराा कालावधी लागेल. त्यामुळे किमान महिनाभराचा कालावधी लागेल.
मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी
शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकेच्या सुमारे 50 ते 60 टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर 25 किंवा 30 रुपये पावशेरपासून सुरु होऊन 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जात आहेत. कोथिंबीरसह सर्व पालेभाज्या महागल्या आहेत. मेथी आणि कांदापात 50 रुपये जुडी एवढा भाव मिळत आहे.
शेतकरी हैराण
वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला करपून जात असल्याने एकीकडे शेतकरी हैराण आहे. मात्र उर्वरित भाजीपाला जगवावा कसा असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. अवकाळी पावसाने अनेक वेळेस जिल्ह्यात हजेरी लावली होती. आता पावसानं ओढ दिली आहे. वाढलेल्या उन्हामुळे भाजीपाल शेतातच करपून जात आहे. पाणी दिल्यानंतरही उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. आहे तसा माल काढून तो बाजारात आणला जात आहे. वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. त्यापेक्षा जास्त उन्हामुळे करपून गेल्याने भाजीपाल्याचे नुकसान होते. वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. त्यापेक्षा जास्त उन्हामुळे करपून गेल्याने भाजीपाल्याचे नुकसान होते.
हे ही वाचा :
नर्सरीनं बदललं महिलेचं जीवन, फळे आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीतून मिळवतेय लाखो रुपये