खडतर प्रवास
मुंबईतील जोगेश्वरीत वसंत फेणे यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना भावंडांसह कारवारमध्ये नेले. तेथेच वसंत फेणेंचं बालपण गेलं. चौथीच्या शिक्षणानंतर मोठ्या भावासोबत साताऱ्याला आले. तिथूनही वर्षभरातच पुन्हा कारवार, मग तिथून पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. शिक्षणासाठीचा असा आडवळणांचा प्रवास फेणेंना करावा लागला.
मूळातच संवदेनशील वृत्ती अंगी असणाऱ्या वसंत फेणेंनी मुंबईत आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी स्वत:ला जोडून घेतले.
वसंत फेणे यांचे बहुतांश लेखन अनुभवातून झालेलं आहे. वयाच्या पस्तीशीत त्यांनी लेखनास सुरुवात केली. सुरुवातीला दिवाळी अंकातून लेखन, मग 1978 साली पन्नाशीनंतर नोकरी सोडून पूर्णवेळ लेखनास त्यांनी दिला. नव्वदीपर्यंत एकूण 30 पुस्तके प्रसिद्ध झाली. प्रसिद्धी आणि पुरस्कारांपासून ते कायमच दूर राहिले. एक व्रतस्थ लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
कथालेखनासह कादंबरी, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशी साहित्याचे विविध अंगही त्यांनी हाताळले. मात्र कथा आणि कादंबरी हे त्यांच्या लेखनातील आवडते प्रकार राहिले.
पुरस्कार आणि गौरव
‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या वर्षी ‘शब्द – द बुक गॅलरी’च्या वतीने वसंत फेणे यांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीसाठी ‘भाऊ पाथ्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार’ देण्यात आला.
वसंत फेणे यांची साहित्यसूची
- काना आणि मात्रा (कथासंग्रह)
- कारवारची माती (कादंबरी)
- काही प्यादी काही फर्जी (कथासंग्रह)
- ज्याचा त्याचा क्रूस (कथासंग्रह)
- देशांतर कथा (कथासंग्रह)
- ध्वजा (कथा, लेख, भाषणे)
- निर्वासित नाती (कथासंग्रह)
- पंचकथाई (कथासंग्रह)
- पहिला अध्याय (कथासंग्रह)
- पाणसावल्यांची वसाहत (कथासंग्रह)
- पिता-पुत्र (कथा)
- मावळतीचे मृदगंध (कथासंग्रह)
- मुळे आणि पाळे (कथासंग्रह)
- विश्वंभरे बोलविले (कादंबरी)
- शतकान्तिका (कथासंग्रह)
- सहस्रचंद्रदर्शन (कादंबरी)
- सेन्ट्रल बस स्टेशन (कादंबरी)
- हे झाड जगावेगळे (कथासंग्रह)