Vasai Virar News :  वसई विरार (Vasai Virar) शहर महानगरपालिकेत घर घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विरार पोलिसांनी शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के (Duplicate Stamps) आणि लेटर हेड (LetterHead) बनवणारी टोळीला अटक केली आहे. ही टोळी बनावट शिक्के आणि लेटरहेडच्या माध्यमातून इमारतींना बोगस शासकीय परवानग्या देत होती. या टोळीने आतापर्यंत 55 इमारतींना खोटे शिक्के आणि लेटरहेडच्या माध्यमातून बोगस कागदपञे पुरवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच ही टोळी विकासकच्या माध्यमातून नागरिकांची नोंदणी देखील करुन देत होती. 


या टोळीने एकूण 115 बनावट शिक्के तयार केले होते. यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका, सिडको, ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, एम.एम.आर.डी.ए. तहसिलदार वसई, वसई आणि भिंवडीचे दुय्यम निबंधक कार्यालय, महसूल विभाग, त्याचबरोबर बिल्डर, वकील, आर्किटेक्चर, अभियंते, बँक फायनान्स, डॉक्टर यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच या टोळीने वसई विरार महानगरपालिका आणि सिडकोच्या शासकीय मुद्रा वापरुन लेटर हेड देखील बनवून घेतलं होतं. 


बँकेतूनही लोन करुन देत होती ही टोळी


बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणं एवढ्यावरच ही टोळी थांबली नाही तर यांनी  बोगस कागदपञांच्या आधारावर बिल्डरकडून रेरामध्येही इमारतीची नोंदणी करुन घेतली. याच कागपत्रांच्या आधारावर नागरिकांचे रचिस्ट्रेशन आणि बँकेतूनही लोन करुन देण्यात येत होते. विरार पोलिसांनी या टोळीचं भांड फोडलं. त्याचप्रमाणे त्यांनी बोगस बिल्डरच रॅकेटही उध्दवस्त केलं आहे.  आतापर्यंत विरार पोलिसांनी जमीनमालक आणि बांधकाम विकासक दिलीप बेनवंशी, मच्छिंद्र मारुत व्हनमाने,  दिलीप अडखळे, प्रशांत मधुकर पाटील आणि रबर स्टॅम्प बनवणारा राजेश रामचंद्र नाईक असे पाच जणांना अटक केली आहे. 


हे आरोपी रुद्रांश इमारतीचे विकासक आणि भागीदार आहेत. या टोळीचं 2015 ते 2023 पर्यंत रॅकेट सुरु होतं. त्यामुळे यामध्ये किती नागरिकांची फसवणूक झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भविष्यात या मोठ्या रॅकेटचा तपास पोलिसांनी प्रामाणिकपणे करुन, सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. 


तर नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोणत्याही कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणतंही पाऊल न उचलण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का हे समोर येणं गरजचं आहे. 


हेही वाचा : 


BMC Covid Scam : BMC कथित कोविड घोटाळा; माजी महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार