Prakash Ambedkar : मशिदीच्या (Mosque) खाली मंदिर (Temples) असल्याचे दावे केले जात आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करुन सौहार्द बिघडवण्याचे षडयंत्र सुरु आहे. परंतू, स्तूप व बौद्ध प्रार्थनास्थळावर (Buddhist places of worship) बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत हे वक्तव्य केलं आहे.


नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?


90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे. माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा करू लागले तर? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. मी सुचवतो की भाजप-आरएसएसने एम सिद्दिक (डी) थ्रिल लार्स विरुद्ध महंत सुरेश दास आणि इतरांमधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांच्या कायद्यातील कट-ऑफ तारखेचे महत्त्व नमूद केले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


 






भाजप-आरएसएसला देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का?


आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मीयांनी प्रार्थनास्थळांच्या कायद्याची कट-ऑफ तारीख स्वीकारली आहे. भाजप-आरएसएसला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का? असा सवाल देखील आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अद्या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्वायवर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या मुद्यावरु राजकारण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune News : पुण्याप्रमाणे देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या; पुण्यातील दाम्पत्याची सर्वोच्च न्यायलयात मागणी