Vanchit Bahujan Aghadi : उमेदवार बदलीचा सिलसिला वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरूच आहे. लोकसभेचे दोन टप्पे पार होऊन तिसऱ्या टप्प्याचे मतदान राज्यांमध्ये आले, तरी उमेदवारी बदलाचा सिलसिला सुरूच ठेवण्याची नामुष्की वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. त्यामुळे दिलेली उमेदवारी रद्द करणे किंवा उमेदवारी बदलण्याचा वंचित बहुजन आघाडीचा खेळ सुरूच आहे. आता वंचित बहुजन आघाडीला उत्तर मुंबईमध्ये जाहीर केलेली उमेदवारी सुद्धा बदलावी लागली आहे.
उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न फसला
उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न वंचितकडून होता. याठिकाणी बिना सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, उमेदवाराने माघार घेतल्याने उमेदवारी बदलाची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. आता नव्याने सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 39 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली आहे तर चार ठिकाणी पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांची संख्या जवळपास दुहेरी आकड्यात गेली आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांना तर नागपुरात विकास ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला. बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
अनेक जागांवर उमेदवारांचा खेळखंडोबा
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार बदलण्यात आला आहे. संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात आधी भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजीव कलकोरी हे उमेदवार होते. त्यांच्याऐवजी आता परमेश्वर रणशूर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मुंबई ईशान्यमधून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला. मात्र, वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. रामटेकमधून शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्याने वंचितनं आपला उमेदवार माघार घेतला होता. यवतमाळमधून तब्येतीच्या कारणामुळे सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला. मात्र, अर्जच बाद झाल्याने अपक्ष अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या