Utpanna Ekadashi 2020 : पौराणिक मान्यतांनुसार, मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कामांसाठी महत्वाचा मानला जातो. हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या महिन्यात पूजा, दान आणि स्नानाच्या विधींना विशेष महत्व आहे. हिंदू धर्माच्या कालदर्शिकेप्रमाणे आज 11 डिसेंबर रोजी उत्पन्ना एकादशी आहे. एकादशीचे व्रत मनातील सर्व इच्छा पूर्ण करतं, असं मानलं जातं. एकादशीच्या व्रताचे महात्म महाभारतातही मिळतं. पौराणिक कथेनुसार युधिष्ठिर आणि अर्जुन यांना श्रीकृष्णाने एकादशीचे महत्व आणि त्याबद्दलच्या सर्व विधींची माहिती दिली होती.


पंचांगानुसार, 11 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे. या एकादशीला उत्पत्ती एकादशी असंही म्हटलं जातं. उत्पत्ती एकादशीला सर्व प्रकारच्या पापतून मुक्ती देणारी एकादशी मानली जाते. हे एकादशीचं व्रत केल्यानं दापत्यांच्या जीवनात समृध्दी येते असा समज आहे. तसेच घरातील तणाव आणि भांडणांचाही नाश होतो असं मानलं जातं.


उत्पत्ती एकादशीचे व्रत भगवान विष्णुंना समर्पित


उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णुंना समर्पित केलं जातं. या दिवशी भगवान विष्णुची विशेष उपासना केली जाते. विधी पूर्वत या व्रताला केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असा समज आहे. या व्रताचा विधी केल्यानं दांपत्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक उर्जादेखील संपूण जाते. त्यामुळे घरात समृध्दी नांदते, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार, भय यापासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं.


एकादशीचा विधी


एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर व्रत करण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे. त्यानंतर भगवान विष्णुंची पूजा सुरु केली पाहिजे. यावेळी पिवळे वस्त्र आणि फूलांना देवाला अर्पन करायला हवं. संध्याकाळीही पूजा करणं आवश्यक आहे.


उत्पत्ती एकादशीचा मुहूर्त


11 डिसेंबर 2020- सकाळी पूजा मुहूर्त: सकाळी 5:15 वाजल्यापासून ते सकाळी 6:05 पर्यंत
11 डिसेंबर 2020-संध्याकाळी पूजा मुहूर्त: संध्याकाळी 5:43 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7:03 पर्यंत
12 डिसेंबर 2020-पारण: सकाळी 6:58 वाजल्यापासून ते 7:02 पर्यंत