देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी संप, देशभरातील एक लाख 10 हजार डॉक्टर्स संपात सहभागी, बीएएमएस डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणात 58 शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्यानं विरोध


2. फायझर कंपनीचे दस्तऐवज चोरण्याचा हॅकर्सचा प्रयत्न, भारतातील लस निर्मीती करणाऱ्या कंपन्याही रडारवर, इंटरपोलकडून ऑरेंज नोटीस जारी


3. कृषी कायदा रद्द न केल्यास रेल्वे रोखण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, तर प्रस्तावातील आक्षेप असलेल्या बाबींवर चर्चा करण्यास तयार; कृषीमंत्री तोमर यांची माहिती


4. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द, 13 ते 14 तारखेदरम्यान जेजुरीत येऊ नका; प्रशासनाचं आवाहन, तर वद्य एकादशी निमित्त नामदेवांच्या पादुका आळंदीसाठी रवाना


5. एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि भावाची हत्या करुन आरोपीची आत्महत्या, नागपूरमधील धक्कादायक घटना


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 डिसेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. ऐन थंडीच्या मोसमात मुंबईत पावसाची हजेरी, मुंबईतील वडाळा परिसरात पावसाच्या हलक्या सरी, इतर भागांतही पावसाच्या तुरळक सरी


7. पुढच्या वर्षी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती; महाराष्ट्रात तीन कोटी लोकांना पहिल्या टप्प्यांत लस देणार आरोग्यमंत्र्यांची माहिती


8. शिस्त न पाळल्यास 31 डिसेंबरपूर्वी मुंबईत नाईट कर्फ्यू, मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा, परळ आणि वांद्र्यातील नाईट क्लबवर पालिकेचा छापा


9. मुंबईतील घरांसाठी पुढील दोन ते तीन आठवड्यात म्हाडाची लॉटरी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती, आजपासून पुण्यातील घरांसाठी अर्ज नोंदणी सुरु


10. अमेरिकेत कोरोनामुळे एकाच दिवसांत तीन हजार 124 नागरिकांचा मृत्यू, 9/11 हल्ल्यापेक्षा मोठी जीवितहानी