मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. आज (मंगळवार) पुणे, रायगड, रत्नागिरी, शिर्डीसह जुन्नर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. रायगडच्या महाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.


जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे गारांचा पाऊस झाला आहे.तब्बल अर्धा तास या गारांनी झोडपून काढलं. या यात शेतकऱ्यांचे बरंच नुकसान होण्याची शक्यता आहे. तर शिर्डीमध्ये मोठ्या पावसामुळं शेतीचं नुकसान झालं आहे.

जुन्नर आणि अहमदनगर भागात मोठ्या प्रमाणात कांदा आणि टॉमेटो तोडणीस आली आहे. पण आजच्या गारांच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचं बरंच नुकसान होण्याची शक्यता आहे. तर कोकणातही या अवकाळी पावसाने आंब्याचं पिकं धोक्यात आलं आहे.