Maharashtra Weather : राज्यात एका बाजूला उष्णतेचा (Heat) कहर सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस  (Rain) देखील पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अहमदनगर, नागपूर, पुणे, भंडारा या भागात चांगलाच अवकाळी पाऊस झालाय. काही भागात शेती पिकांना फटका देखील बसलाय. दरम्यान, हा अवकाळी पाऊस किती दिवस असणार? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh ) यांनी दिलीय. 


16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार


पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. 


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता 


दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपीट होणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 16 मे पर्यंत ढगाळ वातावरण अन तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.


मध्य महाराष्ट्रातील 'या' 5 जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता 


मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील उस्मानाबाद आणि लातूर अशा एकूण 5 जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली की, 16 मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण राहणार आहे.


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पावसामुळं नागरिकांना उकाड्यापाून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्याम, मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनग, नाशिक, वर्धा, पुणे, धुळे या भागात चांगला अवकाळी पाऊ, झाला आहे. तसेच छत्रपती संभजीनंगरमध्येही जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain : पुण्यात धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ, 'मविआ'च्या सभा रद्द