CBSE Date Sheet 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे.  कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही डेटशीट cbse.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

CBSE ची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणार आहे. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. 

दहावीची पहिली टर्म परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार

  • 30 नोव्हेंबर - समाजशास्त्र
  • 2 डिसेंबर - विज्ञान
  • 3 डिसेंबर - होम सायन्स 
  • 4 डिसेंबर - गणित 
  • 8 डिसेंबर - कंप्युटर अॅप्लीकेशन 
  • 9 डिसेंबर - हिंदी 
  • 11 डिसेंबर - इंग्रजी

बारावीची पहिली टर्म परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होणार

  • 1 डिसेंबर  - सोशियोलॉजी
  • 3 डिसेंबर - इंग्लिश
  • 6 डिसेंबर - गणित 
  • 7 डिसेंबर - फिजिकल एज्युकेशन
  • 8 डिसेंबर - बिजनेस स्टडीज 
  • 9 डिसेंबर -  भूगोल
  • 10 डिसेंबर - फिजिक्स 
  • 11 डिसेंबर - सायकोलॉजी 
  • 13 डिसेंबर- अकाउंटन्सी 
  • 14 डिसेंबर- केमिस्ट्री 
  • 15 डिसेंबर - इकोनॉमिक्स 
  • 16 डिसेंबर - हिंदी 
  • 17 डिसेंबर- पॉलिटिकल सायन्स
  •  18 डिसेंबर- बायोलॉजी 
  • 20 डिसेंबर - हिस्ट्री 
  • 21 डिसेंबर - कंप्युटर एप्लीकेशन / इनफॉर्मेशन प्रॅक्टिस 
  • 22  डिसेंबर - होम सायन्स

 

 

 

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI