Ulhasnagar Municipal Corporation: ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा वाढता धोका पाहता जगभरात प्रवासी आणि इतर निर्बंध लागू करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका अलर्ट झाली आहे. उल्हासनगर पालिकेकडून नागरिकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार, कोरोना लशीचा दुसरा लस चुकवल्यास दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे. तर, विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. मास्क ऐवजी रुमाल किंवा स्कार्फ बांधून फिरणाऱ्यांनाही दंड भरावा लागणार आहे.


उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं. वर्षाचे बाराही महिने उल्हासनगर शहर ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं. त्यामुळं कोरोनाचा फैलाव दुकानांमधून होऊ नये, यासाठी दुकानदार आणि कामगारांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आलंय. तर, ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असतील, आणि मास्क घातला असेल, त्यांनाच दुकानात प्रवेश दिला जाणार आहे.


या नियमांचं उल्लंघन झालं तर, दुकानदाराला थेट 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर, शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येतोय. मास्क न वापरता रुमाल किंवा स्कार्फ बांधून फिरणाऱ्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी हे उल्हासनगरच्या अतिशय गजबजलेल्या गोल मैदान आणि गजानन मार्केट परिसरात धडक कारवाई करतायेत. त्यामुळं नागरिक आणि दुकानदार यांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-