मुंबई : महाविकासआघाडी सरकारमधल्याच ओबीसी नेत्यांनी षडयंत्र रचत मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवून दिलं नाही. सोबतच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुफळी निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न ओबीसी नेते करत असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी केला आहे. 


मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही एसटी, ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाची भूमिका आहे. त्यांचा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठींबा देखील आहे. मात्र, ओबीसी नेते त्यांचा देखील विरोध असल्याचं भासवत असल्याची टीका केली आहे.  संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिनाचा सोहळा आज मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला.  यासाठी संपूर्ण राज्यातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णायक दिशा ठरवण्यासाठी हा महामेळावा मुंबईतल्या वांद्रेतील रंगशारदा सभागृहात घेण्यात येतआहे. 


मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते देखील ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी संभाजी ब्रिगेडची आधीपासूनची मागणी आहे. महाराष्ट्रात अनेक मुक मोर्चा, ठोक मोर्चा निघालेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्च्यात सहभागी झाला होता. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. काही राजकीय संघटनांनी मिळून मराठा आरक्षणासाठी उभं केलेलं आंदोलन पाडल्याचा देखील आरोप आखरेंनी केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सक्रियपणे उतरणार असून राजकीय पक्षांच्या पोटावर जोपर्यंत पाय पडत नाही तोपर्यंत ही मंडळी सुधरणार नसल्याची देखील प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी संभाजी ब्रिगेड आपले उमेदवार देणार आहे. मराठा आरक्षणाचा लढा स्वतंत्र्यपणे उभारणार करणारअसून शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल ह्यासाठी उभे राहू असं देखील आखरे म्हणालेत. 


दुसरीकडे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी देखील आमची मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात येत आहे.  मराठा आरक्षणातील घोळाला महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे वकील कुंभकोणी जबाबदार असून षड्यंत्र रचत मराठा आरक्षणाला डावललं गेल्याचा आरोप ॲड मनोज आखरेंकडून करण्यात आला आहे. न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरील लढाई देखील संभाजी ब्रिगेड लढणार आहे. मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाज आमच्या पाठिशी आहे मात्र ओबीसी नेत्यांकडून हेतु पुरस्सर ह्यातून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न करत आहेत असं देखील ते म्हणालेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




इतर महत्त्वाच्या बातम्या :


Vidarbha state : वेगळ्या विदर्भ राज्याचा विचार? केंद्र सरकारने संसदेला दिली 'ही' माहिती


100 Crore Vasooli : भेटीगाठीचं सत्र थांबेना, वाझे-परमबीर भेटीनंतर आता वाझे-देशमुख यांच्यातही भेट?


नियमांनी थट्टा मांडली! दुचाकीवरील अजब नंबर प्लेटमुळे तरुणीला घराबाहेर पडणे झालंय कठीण