Corona Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्या धडकी भरवणारी ठरत आहे. दररोज यामध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने अधिकत चिंता वाढवली आहे. कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे, असे असतानाही उल्हासनगरमध्ये विदेशातून आलेले एक कुटुंब संपूर्ण देशभर फिरले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या कुटुंबाचा कोरोना चाचणीचा अहवाल प्रतिक्षेत होता. प्रशासनाकडून या कुटुंबाला क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आल्या होत्या. पण या कुटुंबाने प्रशासनाच्या सूचना झुगारुन लावत आपला आणि नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. १७ डिसेंबर रोजी एक कुटुंब केनियातून उल्हासनगरमध्ये आले होते. नियमांप्रमाणे त्यांची चाचणीही घेण्यात आली. नियमांनुसार या कुटुंबाला क्वारंटाईन राहायचे होतं. मात्र, हे कुटुंब देशभर फिरले. चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या कुटुंबावर निमायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केनियातून आलेले हे कुटुंब क्वारंटाईन न राहाता संपूर्ण देशभर फिरले. १७ डिसेंबर रोजी उल्हासनगरमध्ये कुटुंब आले होते. त्यानंतर कोरोना चाचणी अहवाल येण्याच्या आधी कुटुंब होम कॉरंटाइन न होता देशभरातील विविध ठिकाणी सार्वजनिक प्रवास केला. अमृतसर गोल्डन टेम्पल, जम्मू काश्मीर,वैष्णव देवी या ठिकाणी हे कुटुंब फिरायला गेले होते. प्रशासनाकडे या कुटुंबाचा रिपोर्ट आला. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर काही सदस्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. उल्हासनगर महापालिकडून या कुटुंबावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका वैद्यकीय अधिकारी या कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यास गेले असता ते कुटुंब सहलीसाठी परराज्यात गेले असल्याचे दिसल्याने महापालिका यंत्रणा हादरली. लागलीच फोन करून या कुटुंबाला जेथे आहे तेथे क्वॉरंटाईन होण्यास सांगितले. मात्र हे कुटुंब सर्वत्र फिरत होते आणि ३१ डिसेंबर रोजी उल्हासनगरला पुन्हा घरी आले. कोरोना आणि ओमिक्रॉन या रोगाच्या नियम अटींबाबत या कुटुंबाने हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याने आज उल्हासनगरमधील शासन नियमांच्या अटी शर्ती भंग केल्याबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी यांनी या परिवार प्रमुखाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे.
संबधित बातम्या :
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा
Coronavirus Maharashtra : राजेश टोपे यांचा इशारा, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास....
Vistara Airline Offer: फक्त 977 रुपयांत करा विमानातून प्रवास, विस्तारा एअरलाईन्सची भन्नाट ऑफर!
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live