Tejas Thackeray Team Discovered New Snake: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या टीमनं एक नव्या प्रजातीचा साप शोधला आहे. 'सह्याद्रीओफिस' (Sahyadriofis) असं या सापाला नाव देण्यात आलं असून ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या (Thackeray Wildlife Foundation) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तेजस ठाकरे तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्शिल पटेल यांनी पश्चिम घाटात (Western Ghats) संशोधनादरम्यान सापाची ही नवी प्रजाती शोधून काढली. पश्चिम घाटाच्या निसर्गात तेजस ठाकरे आणि टीमनं सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तसेच, आढळून आलेल्या या नव्या प्रजातीला 'सह्याद्रीओफिस' असं नाव देण्यात आलं आहे. या सापाच्या प्रजातीसंदर्भातील शोधनिबंध (Research Paper) नॅशनल हिस्ट्री म्युझियम, लंडन आणि मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट, जर्मनी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
ओळख नसलेल्या या नव्या प्रजातींना मिळवून दिलीये नवी ओळख
तेजस ठाकरे अनेक जंगलांत भ्रमंती करून निसर्गाच्या जैवविविधतेतील नावीन्य शोधण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला असून त्यांचं नामकरणंही केलं आहे. ओळख नसलेल्या या नव्या प्रजातींना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली आहे. सिंधुदुर्गमधील आंबोलीच्या हिरण्यकेशी येथे आढळणारा मनमोहक सोनेरी 'देवाचा मासा' संवर्धनासाठी तेजस ठाकरे यांनी संवर्धन मोहीमही सुरू केली आहे. दरम्यान, यामध्ये आता पश्चिम घाटातील आणखी एक सापाची नवी प्रजाती तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं शोधून काढली आहे.
नव्या प्रजातीच्या सापाला 'सह्याद्रीओफिस' नाव का दिलं?
'सह्याद्रीओफिस' असं या सापाला नाव देण्यात आलं आहे. यामध्ये संस्कृत शब्द सह्याद्री (Sahyadri) आणि ग्रीक शब्द ओफिस म्हणजे साप (Snake) यावरून या नव्या प्रजातीला 'सह्याद्रीओफिस' असं नाव देण्यात आलं आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या या नव्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत नवनवीन माहिती जनतेसाठी उपलब्ध होत आहे. तसेच, नवनव्या प्रजातींचा शोध घेतला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधलीय. या माश्याची ही 20 वी प्रजाती आहे. आणि तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.