Uddhav Thackeray PC  : पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर हल्ला केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील  दहा महत्वाचे मुद्दे 


Uddhav Thackeray PC LIVE : माझं नाव आणि चिन्ह चोरलं 


माझं नाव आणि चिन्ह चोरलं आहे. हा पूर्वनियोजीत कट आहे. त्यांना माँ साहेबांच्या पोटी जन्माला मी आलो आहे हे भाग्य मिळणारं नाही. हे  भाग्य त्यांना चोरता नाही किंवा दिल्लीला देखील देता येणार नाही.  


Uddhav Thackeray PC : 2024 नंतर देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होणार


 2024 सालची निवडणूकही पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची निवडणूक ठरू शकेल कारण त्यांचा यांनतर देशात नंगानाच  सुरु होणार आहे. आता जर जागे नाही झालो तर उशीर होईल.  आता सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे.


Uddhav Thackeray Speech : निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य 


आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


Uddhav Thackeray PC update : सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त करावा


आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोर्टात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही.  सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. ही शिवसेनेची मागणी आहे. 


Shivsena Uddhav Thackeray PC : माझे वडील चोरले आणखी कुणा कुणाचे वडील चोरणार? 


 कोण तरी म्हणाले अमित शाह माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे वडील चोरले आणखी कुणा कुणाला चोरणार माहिती नाही, अशा शब्दात टीका केली आहे,.


Shivsena PC Today : आम्ही लाखोंने कागदपत्रं दिली मात्र त्याचं पुढं काय झालं? 


काँग्रेस मध्ये समाज वादी पार्टीत असाच वाद झाला होता. बाकी कुणालाही अशा प्रकारे देण्यात आलेलं नाही. मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्र आम्ही दिली आहेत मात्र याची चौकशी झाली आणि असं काहीचं नसल्याच समोर आले.  आम्ही लाखोंने कागदपत्रं दिली मात्र त्याचं पुढं काय झालं? असा सवाल उपस्थित केला


Uddhav Thackeray PC : रावणाला धनुष्य पेललं नाही मिंध्याना पण ते पेलणार नाही


रावणाला धनुष्य पेलल नाहीं मग मिंध्याना ते पेलले जाणार नाही. आमच्याकडे असणारे आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण आधीच्या निवडणुकीत दोन गट मान्य केले आहेत. आमचा आणि त्यांचा संबंध राहणार नाही


Uddhav Thackeray PC Highlights : सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा


सर्वोच्च न्यायालयात आम्ही आवाहन दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा आहेत. 


Shivsena Uddhav Thackeray PC : मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा  फोन आला


मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा फोन आला. नितीश कुमारांचा देखील फोन आला.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दूरध्वनीवर संवाद साधून, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली.